कुमार गंधर्व : एक सृजनयात्रा (Kumar Gandharv: Ek Srujanyatra)

By डॉ. शिल्पा बहुलेकर (Dr. shilpa Bahulekar)

$8.41

Description

कुमार गंधर्व – एक सृजनयात्रा’ यामध्ये कुमारनिर्मित जोडराग आणि पारंपरिक राग यातील साम्य-भेद, रागनिर्मितीची आणि बंदिशनिर्मितीमधील सौंदर्यतत्त्वे उलगडण्याचा यत्न केला आहे. कुमारजीचे सांगीतिक विचार शब्दबध्द केले आहेत.

कुमारगंधर्व यांनी स्वरलिपिबध्द केलेल्या संत तुकाराम यांच्या अभंगांच्या रचनाशैलीचे वेगळेपण, तालातील विविधता, प्रासादिकता, निदर्शनास आणून दिली आहे. निर्गुणी भजनशैलीतील कुमारजींना अभिप्रेत असलेली भूमिका व विचारसरणी समजण्यासाठी काही भजनांचे अर्थ अभ्यासकांसाठी समाविष्ट केले आहेत. संत सूरदास, संत तुलसीदास, संत मीराबाई यांच्या भजनांवर कुमारजीनी निर्मिलेल्या स्वररचनांवर भाष्य केले आहे.

पं.कुमारगंधर्व यांच्या सांगीतिक मूलगामी विचारतत्त्वांचे ज्ञान भविष्यातील नव्या पिढीतील संगीतसाधकाला असायला हवे. संगीतातील प्रत्येक घटकाविषयी जसे स्वर, ताल, लय, शब्द यातून निर्माण होणारी बंदिश, रागमूर्ती घडवण्यास कशी समर्थ असते हे अनुभवताना कुमारजीनी परंपरा जपली आहे. स्वरसाधना, आवाजाचा उपयोग, मैफलींचे नियोजन, जोडरागांची तत्त्वे, रागसमय, गुरुशिष्य नाते कसे असावे,

संगीतातील कुमारगंधर्व यांचे उत्तुंग व्यक्तिमत्च आणि कुमारगायनशैली अनुभवतांना कुमारजीचे शिष्य, सोबती, स्नेही, समीक्षक, ज्येष्ठश्रेष्ठ मैफलगायक, संगीतकार या सर्व मान्यवरांबरोबर अनेकदा झालेल्या संवादातून व मुलाखतीतून लेखकांना कुमारजींची सृजनयात्रा शब्दबध्द करता आली.

Additional information

Weight 240 oz
Language

Marathi