$14.00
Genre
Memoir & Biography, Novels & Short Stories
Print Length
260 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2013
ISBN
9788174342584
Weight
224 Gram
जगाच्या पाठीवर' हे कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांनी लिहिलेलं आत्मचरित्र संपूर्ण नाही, अर्धं देखील नाही. त्यांच्या आयुष्याच्या अगदी प्रारंभी लहरी नियतीनं त्यांना जी वणवण भटकंती करायला भाग पाडलं, त्या भंडावून सोडणा-या प्रवासाचा फक्त एका भल्यामोठया टप्प्यापर्यंतचा हा वृत्तांत आहे. हे असं अपुरं आत्मचरित्र हुरहुर लावणारं तर आहेच, पण दैन्याचे दशावतार अनुभवत असतानाच त्यांनी संगीतसाधना कशी केली, याचं विलक्षण दर्शन घडवणारंही आहे. या ओघवत्या आत्मकथनात बाबूजींच्या सश्रद्घ, सुसंस्कारित मनाचं स्वच्छ प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं आणि ठार वेडं होण्याच्या स्थितीत किंवा आत्महत्या करण्याच्या विचारात असतानादेखील त्यांनी जिवापाड जपलेला स्वाभिमानी स्वरही आपल्याला ऐकू येतो... बाबूजींचं यश आणि त्यांची लोकप्रियता अनेकांना ठाऊक आहे, पण त्या यशामागे दडलेलं अपयश आणि लोकप्रियतेमागची खडतर कलासाधना समजून घेण्यासाठी हे आत्मचरित्र वाचायलाच हवं.
0
out of 5