Logo

  •  support@imusti.com

Sadha Manoos (साधा माणूस)

Price: $ 12.36

Condition: New

Isbn: 9788174867117

Publisher: Mouj Prakashan Griha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir and Biography,Novels and Short Stories,

Publishing Date / Year: 2008

No of Pages: 242

Weight: 395 Gram

Total Price: $ 12.36

    0       VIEW CART

...हे आयुष्य मी कसे उपयोजिले, उधळले, अगर सार्थकी लावले, याचा प्रामाणिक आढावा आज घेणे उपयुक्त ठरावे... या प्रदीर्घ प्रवासात हवे ते मिळावे का, नको वाटले ते टाळले गेले का, चालता चालता जे गोळा केले गेले, झाले, ते सुखद झाले का, याचाही विचार मनात येतो... अभिजात नट, प्रथितयश नाटककार, लेखक, गायक, कवी, निष्णात सर्जन, साधा माणूस आणि थोर सेनानी यांच्या प्रत्यक्ष परिचयाने, सहवासाने आणि काहींच्या अगत्याने माझे जीवन समृद्ध आहे... शुद्ध प्रेम कधीही न करता प्रेमावर व्याख्याने झोडपणारे ऐकले; पोथ्या उलथ्यापालथ्या करून देव दिसल्याचा दावा करणारेही दिसले. पैसा व प्रतिष्ठा यांसाठी देशभक्तीचा धंदा करणारे ठोक आणि किरकोळ व्यापारी पाहावे लागले...मुंबईच्या महापौरापासून दिल्लीच्या देवापर्यंत दोस्ती असल्याचा खोटा दावा करणाऱ्या संधिसाधूंची अधेमधे गाठ पडत होती... चिकणी सुपारी चघळणाऱ्याप्रमाणे देवाचे नाव श्रद्धेविना चघळणाऱ्या भोंदू साधूंचीही भेट घडली... तसे काहीही न बोलता स्वत:च्या सर्वस्वाचा हसत होम करणारे काही क्रांतिकारकही जवळून पाहण्याचे भाग्य लाभले... विश्वाच्या भल्याकरताच आत्मचिंतनात मग्न झालेल्या काही महापुरूषांचे दुर्मिळ दर्शन घडले... ...या सर्वांत मी कुठं होतो, आहे? ते सांगण्यासाठीच ‘मी’, ‘मला’, ‘माझे’ असे म्हणणाऱ्या माझ्यातील ‘मी’चा शोध लावण्याच्याच मागं मी अद्याप आहे... तो शोध लागेपर्यंत मला मूकपणे चालतच राहिले पाहिजे... ८४व्या वर्षात पदार्पण करत असताना भालजी पेंढारकर यांनी व्यक्त केलेले स्वगत.