Satyajit Ray Likhit Fantastic Feluda Rahasyakatha: Royal Bengal Rahasya (सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा: रॉयल ब॓ंगाॅलचे रहस्य)

By Satyajit Ray, Ashok Jain (Anuvad) (सत्यजित रे, अशोक जैन (अनुवाद))

Satyajit Ray Likhit Fantastic Feluda Rahasyakatha: Royal Bengal Rahasya (सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा: रॉयल ब॓ंगाॅलचे रहस्य)

By Satyajit Ray, Ashok Jain (Anuvad) (सत्यजित रे, अशोक जैन (अनुवाद))

$8.57

$9.43 10% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Crime & Mystery, Novels & Short Stories

Print Length

120 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2010

ISBN

9789380361116

Weight

120 Gram

Description

प्रख्यात शिकारी व वन्यजीवन लेखक महितोष सिन्हा रॉय यांच्या प्रासादात फेलूदा त्यांना भेटायला गेला असता पूर्वजांचा मौल्यवान खजिना कुठे दडवला आहे याचं सांकेतिक भाषेतील कोड त्याला दिलं जातं, परंतु त्याची उकल करण्यापूर्वीच सिन्हा रॉय यांच्या तरुण सचिवाचं प्रेत जंगलात सापडतं. वाघानं ते छिन्नविछिन्न केलेलं असतं. फेलूदाला तपासकामात सिन्हा रॉय यांच्या घराण्याची वादग्रस्त गुपितं उलगडत जातात आणि फेलूदाची जंगलात गाठ पडते एका रॉयल बेंगॉल नरभक्षक वाघाशी. साहस, शिकार व घनदाट जंगलाइतकेच घनगर्द रहस्य यांचं अदभुत मिश्रण असलेली ही चित्तथरारक कादंबरी. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे सहावे पुस्तक. विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही. या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%