$4.85
Print Length
166 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2021
ISBN
9789391469078
Weight
0.48 Pound
महिला बचत गट. अधून-मधून कानावर येणारे शब्द. पण त्यांची सुरुवात, प्रसार, उपयुक्तता अशा तपशिलाच्या खोलात बाहेरचं फारसं कुणी जात नाही. फार फार तर ‘चटण्या-मसाले बनवणाऱ्या बायका' एवढ्यावर बोळवण होते, किंवा ‘बायका बायका जमून काही करताहेत, तर करू द्या,' इतपत उदारपणा दाखवला जातो! ‘थेंबे थेंबे तळे साचे' ही म्हण तशी खूप जुनी. पण तिला नवा अर्थ दिला, तो बचत गटातल्या गरीब पण होतकरू व धडपडणाऱ्या महिलांनीच. ग्रामीण स्त्रियांनी रुपया रुपया जिवापाड वाचवून बचत गटात घातला; तर तो वाढतो, वेळेला उपयोगी पडतो आणि बाईचा आत्मसन्मानही वाढवतो... महिला बचत गटातून विधायक आर्थिक बदल घडवणाऱ्या सभासद बायका, त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या व्यक्ती-संस्था आणि शासनाच्या सकारात्मक योजना या सगळ्यांची वाटचाल जिव्हाळ्यानं पाहायचा हा प्रयत्न. महिला बचत गटांच्या प्रवासाचा नि फलितांचा लेखाजोखाच जणू!
0
out of 5