Logo

  •  support@imusti.com

Vinoba (विनोबा)

Price: $ 14.00

Condition: New

Isbn: 9788174342263

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,Social Science,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2013

No of Pages: 225

Weight: 248 Gram

Total Price: $ 14.00

    0       VIEW CART

’’माझ्या विनोबा साहित्याच्या वाचनातून एक गोष्ट मला सातत्याने जाणवत होती. ती म्हणजे गांधीजी आणि विनोबा यांच्या विचारांतील एकत्व.’’विनोबांनी गांधी विचारांची शास्त्रशुद्ध मांडणी केली, त्यातील विकासाच्या अनेक शक्यता दाखवून दिल्या आणि त्यापैकी काही प्रत्यक्षात आणून दाखवल्या.’’गांधींचा मूळ विचार अस्पृश्यतेसंबंधी असो की स्त्रीप्रश्नासंबंधी असो, ग्रामोद्योगाबद्दल असो की सर्वोदयासंबंधी असो, विनोबांनी तो आशयघन केला, त्याला बुद्धिसंगत घाट दिला, त्यातील ऐतिहासिक विकासाचा संदर्भ स्पष्ट केला, त्याला चालू काळाशी सुसंगतता प्राप्त करून दिली आणि आपला स्वतंत्रपणा त्यात न दाखवता आपले नावही त्यात लोपवून टाकले.’’सत्त्याग्रह, सर्वोदय, ग्रामदान, ग्रामस्वराज्य इत्यादी विचार गांधी-विनोबा विचार झाले. हा गांधी विचार आणि तो विनोबा विचार असे अलगअलग विचार दाखवण्याची गरजच नाही. कारण ते मुळी अलग नाहीतच. अगदी माक्र्स-एंगल्स यांच्या विचारांप्रमाणे.’’ – प्रस्तावनेतून