By Chandraprakash Deval (चंद्रप्रकाश देवल), Asavari Kakde - Anuvad (आसावरी काकडे - अनुवाद)
By Chandraprakash Deval (चंद्रप्रकाश देवल), Asavari Kakde - Anuvad (आसावरी काकडे - अनुवाद)
$12.00
Genre
Novels & Short Stories
Print Length
125 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2007
ISBN
9788174343796
Weight
136 Gram
उत्कृष्ट अनुवादासाठीचा ’साहित्य अकादमी’चा पुरस्कार लाभलेल्या या काव्यसंग्रहाचा गोवा विद्यापीठामधल्या एका पदव्युत्तर अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. महाभारतातली ही कथा. ’गालव’ हा ’विश्वामित्र’ ऋषींचा शिष्य. त्याच्या आग्रहाखातर विश्वामित्र त्याच्याकडे ८०० श्यामकर्णी घोड्यांची दक्षिणा मागतात. ती देण्याची ऐपत नसलेला गालव राजा ’ययाती’कडे जातो. ययातीकडेही तेवढं द्रव्य नसतं, परंतु याचकाला विन्मुख पाठवायचं नाही म्हणून तो आपली रुपमती मुलगी ’माधवी’ विनियोगासाठी गालवाला देतो. तिला ३ राजांकडे प्रत्येकी १ वर्ष गालव उपभोगासाठी ठेवतो. वर्षानंतर प्रत्येकाकडून २०० श्यामकर्णी घोडे घेऊन ६०० घोड्यांची दक्षिणा विश्वामित्राला देतो. विश्वामित्र स्वतःकडे माधवीला वर्षभर ठेवतात आणि उरलेल्या २०० घोड्यांची दक्षिणा माफ करून टाकतात. त्यानंतर ययाती तिचं स्वयंवर मांडतो, परंतु ती सगळ्यांना अव्हेरून तपोवनात निघून जाते. अशी ही आदर्श गुरू, त्याचा आज्ञापालनकर्ता थोर शिष्य आणि नरोत्तम राजा ययाती यांची गोष्ट...यात ’माधवी’चं स्थान काय? तिच्या इच्छा काय? तिला कसं समजावून घ्यायचं? तिच्यापर्यंत कसं पोचायचं? ’माधवी’च्या वेदनेचं महाभारत जाणून तडफडणार्या डॉ. देवल यांनी चहुअंगांनी तिचा वेध घेतला आहे. आणि तरीही हे करताना ते ’स्त्री’ च्या भूमिकेत शिरलेले नाहीत. पुरुष आणि स्त्री आदिअंतापर्यंतचं सत्य निखळपणे, प्रगल्भपणे अन् विनम्रपणे स्वीकारून ’माधवी’ रूपानं स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणार्या व्यथा-वेदनांना ते निर्विषपणे सामोरे गेले आहेत. स्त्री प्रश्नांची दाहकता पुरुषांना जाणवली, तर ती किती थेटपणे भिडू शकते, याचं हा काव्यसंग्रह मूर्तिमंत प्रतीक आहे. कवीचं, त्याच्या काव्याचं अन् अनुवादाचं हे रूप फार विरळा आहे. वाचावंच असं -
0
out of 5