$13.00
Genre
Print Length
200 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2016
ISBN
9788174349545
Weight
197 Gram
जगणं इतकं परावलंबी की, जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच ! औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले. जगणं कसलं ? हे तर वेदना सहन करत मरण लांबवणं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार हवा. आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान. धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्या गुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्न तर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारे जगायचीही सक्ती आहे...संगीतात जे नातं सूर आणि तालाचं, तेच नातं शास्त्रीय प्रगतीत गणित आणि विज्ञानाचं. सूरवाद्य आणि तालवाद्य यांच्या परस्परमेळातून जसं मनाला मोहून टाकणारं कर्णमधुर संगीत जन्म घेतं, तशा गणित अन् विज्ञानाच्या परस्परपूरक कामगिरीतून ज्ञानकक्षा रुंदावत जातात. विज्ञान विश्वातील कोड्यांचा शोध घेत राहतं, तर गणित त्यामागचे सिद्धांत आणि तत्त्व स्पष्ट करत जातं. मानवी संस्कृतीच्या आरंभकाळापासून गणित आणि विज्ञानाची ही जादुई जुगलबंदी चालत आली आहे. अनेक गणितज्ञ अन् वैज्ञानिकांनी रंगवलेल्या या जुगलबंदीची आतंरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञानं सांगितलेली वेधक आणि रसाळ कहाणी गणित आणि विज्ञान: युगायुगांची जुगलबंदी.
0
out of 5