$12.03
Genre
Print Length
410 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2013
ISBN
9789350910085
Weight
370 Gram
दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना तीस वर्षांपूर्वी, म्हणजे १९४८ साली, लिहिलेले माझे हे पहिले नाटक. त्याची १९७९ साली ही दुसरी आवृत्ती काढताना ते पुन्हा एकदा दुरुस्त करून लिहावे असे वाटत होते. पण तो बेत मी बदलला. तीस वर्षांपूर्वीचे माझे विचार, ते नाट्यरूपाने प्रकट करण्याची माझी क्षमता जशी होती ती तशीच दिसू देणे हे मला योग्य वाटले. तीस वर्षांपूर्वीचा माझा फोटो पाहताना आज मला जे वाटते तसेच ह्या माझ्या नाटकाकडे पाहताना वाटते. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे नाटक वाचताना, ते रंगभूमीवर येत असतानाचा काळ मात्र आठवतो. त्यात भाग घेणारे काही कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत वाटली. आपणां सर्वांना सोडून गेलेल्या ग. दि. माडगूळकरांनी ह्या नाटकासाठी गीते लिहून दिली होती. ती गीते मात्र ह्यातल्या तुकोबाच्या अभंगांइतकेच आजही आपले ताजेपण टिकवून राहिली आहेत असे मला वाटते. मराठी रंगभूमीचे रंगरूप काळाबरोबर बदललेल्या आजच्या परिस्थितीत हे माझे नाटक पुन्हा छापून प्रसिद्ध करायची इच्छा दाखवल्याबद्दल मी ह्या नाटकाचे प्रकाशक श्री. श्याम कोपर्डेकर यांचा आभारी आहे.
0
out of 5