Mardhekaranchi Saundaryamimansa (मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा)

By Prabhakar Padhye (प्रभाकर पाध्ये)

Mardhekaranchi Saundaryamimansa (मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा)

By Prabhakar Padhye (प्रभाकर पाध्ये)

$11.74

$12.33 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

260 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2012

ISBN

9788174869999

Weight

330 Gram

Description

सव्वीस-सत्तावीस वर्षांपूर्वी माझे ‘कलेची क्षितिजें’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याला बा. सी. मर्ढेकरांची प्रस्तावना होती. ती वाचून मर्ढेकर या व्यक्तीविषयी जे मत झाले त्याला महत्त्व नाही, पण इतर जी दोन मते झाली त्यांना महत्त्व आहे. त्यांतले एक म्हणजे ‘कलेची क्षितिजें’ हे पुस्तक फारच सदोष आहे. म्हणजे त्याची मूळ भूमिका अजिबात चुकली आहे असे नव्हे तर तिची अधिक व्यवस्थित आणि अधिक अभ्यासपूर्वक मांडणी करायला हवी. हे लक्षात घेऊन त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढायची नाही असा निर्णय मी घेतला. दुसरे मत असे की मर्ढेकरांची भूमिका एकदा मुळापासून तपासायला हवी. माझ्या धावपळीच्या जीवनात ते शक्य नव्हते. अखेरीस वीस वर्षांनी, म्हणजे १९६३ साली, अमेरिकेत प्रिन्स्टन येथे त्याची सुरवात केली, पण लगेच लक्षात आले की हे क्षेत्र फार अफाट आहे: त्याला हात घालणे (विशेषत: पन्नाशी उलटून गेल्यावर) हे फार धाडसाचे आहे. पण मर्ढेकरांच्या सौंदर्यमीमांसेविषयीचे आकर्षण प्रभावी ठरले आणि ते धाडस मी केले. पण घास जरा मोठाच घेतला याची जाणीव मात्र मनाला कुरतडते आहे. या पुस्तकात मर्ढेकरांच्या ज्या पुस्तकांचा उल्लेख केला आहे त्यांचा थोडा खुलासा केला पाहिजे. मर्ढेकरांचे ‘आर्टस्‌ ऍण्ड मॅन’ हे छोटे पुस्तक १९३८ मध्ये इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाले. नंतर १९४० मध्ये त्यांचे ‘वाङ्‍मयीन महात्मता’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर १९४४ मध्ये त्यांची ‘टू लेक्चरस ऑन ऍन ऍस्थेटिक ऑफ लिटरेचर’ प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी अनेक इंग्रजी मराठी लेख लिहिले. या सर्वांतून एक इंग्रजी व एक मराठी अशी दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांतले एक १९६० साली बाहेर पडलेले पॉप्युलर प्रकाशनाचे ‘आर्टस ऍण्ड मॅन’ हे, आणि दुसरे १९५५ साली मौज प्रकाशनाने काढलेले ‘सौंदर्य आणि साहित्य’ हे. या दोन पुस्तकांचा उपयोग मी केला आहे. मी वेळोवेळी निर्देशलेली पृष्ठसंख्या ही या दोन आवृत्त्यांची आहे.* * या पुनर्मुद्रणात ‘सौंदर्य आणि साहित्य’मधील पृष्ठक्रमांक तिसऱ्या आवृत्तीतले आहेत. माझे नेहमीचे प्रकाशक म्हणजे ‘पॉप्युलर प्रकाशन’. ‘मौज प्रकाशन’चे श्री. पु. भागवत यांनी या पुस्तकावर आपल्या चिकित्सक पण आत्मीय मायेची एवढी पाखर घातलेली आहे की त्यांनाच हे पुस्तक द्यावे असे मी ठरविले.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%