$8.01
Genre
Print Length
148 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2011
ISBN
9788174869326
Weight
160 Gram
प्रथितयश लेखिका आशा बगे ह्यांच्या दोन लघुकादंबऱयांच्या ह्या संग्रहात त्यांनी मानवी नातेसंबंधांचे हृदय चित्रण केले आहे. ‘भूमिका'मधून मधल्या पिढीचा दुवा हरवलेल्या आजी-आजोबा आणि नातवाच्या जीवनाकडे पाहण्याच्या भिन्न दृष्टिकोनांचा पट समोर येतो, तर ‘उत्सव'मध्ये एक करिअरिस्ट, स्वतंत्र मनोवृत्तीची आणि दुसरी संसारात गुरफटलेली अशा मैत्रिणींना जाणवणारा एकटेपणा लेखिकेने चित्रित केला आहे. ह्या सर्वच पात्रांची विशेषत स्त्रियांची घुसमट फार परिणामकारक झाली आहे, तशीच त्यांची ठाम निर्णयक्षमताही अचंबित करणारी.
0
out of 5