Dnyaneshvariteel Laukik Srushti (ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी)

By M. Va. Dhond (म. वा. धोंड)

Dnyaneshvariteel Laukik Srushti (ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी)

By M. Va. Dhond (म. वा. धोंड)

$9.21

$9.67 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

179 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2015

Weight

230 Gram

Description

गेल्या तीस वर्षांत वेळोवेळी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या ज्ञानेश्वरीवरील निवडक लेखांचा हा संग्रह आहे. ज्ञानेश्वरीतील दुर्बोध स्थळांचा उलगडा करण्याच्या दृष्टीने लेखांस सुरूवात केली, पण ते लिहीत असताच ज्ञानदेवकालीन लौकिक सृष्टी आणि तिच्याशी निगडित असलेली तत्कालीन भाषा जाणून घेतल्याशिवाय दुर्बोधतेची नीट उकल होणार नाही याचे अधिकाधिक भान येत गेले आणि त्यावर वाढता भर दिला गेला. परंतु ज्ञानदेवकालीन समग्र लौकिक सृष्टीचा शोध घेणे हा या लेखांचा उद्देश नसून, ज्ञानेश्वरीतील दुर्बोध स्थळांचा वेध घेणे एवढ्याच मर्यादित उद्देशाने तत्कालीन लौकिक सृष्टीचा प्रपंच या लेखांत केला गेल आहे. या संग्रहातील ‘विश्वरूपदर्शन’ आणि ‘ज्ञानदेवांचा गीतानुभव’ या दोन लेखांत दुर्बोध स्थळांचा विचार नसला, तरी त्यांत ज्ञानदेवांचे लौकिक सृष्टीशी जडलेले नाते शोधले आहे. ‘ज्ञानेश्वरीतील तमाशा’ हा लेख स्वतंत्रपणे लिहिलेला नसून ‘तमाशा’वरील मोठ्या लेखाचा तो एक भाग आहे. हा लेख स्वतंत्रपणे लिहिला गेला असता तर तो याहून पुष्कळच वेगळा उतरला असता. ‘उखितें आघवें चि मी’ या लेखात माझ्या शोधात मला आलेले अनुभव सांगितले आहेत. ‘पाठचर्चा’ हा अखेरचा लेख मात्र वेगळ्याच स्वरूपाचा आहे. त्यात ज्ञानेश्वरीवर पाठचर्चेच्या अंगाने जे लेखन झाले आहे त्याचा थोडक्यात परार्मश घेऊन, ती फलदायी होण्याकरिता तत्कालीन लौकिक सृष्टी व भाषा यांचा शोध घेण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%