$7.44
Print Length
108 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2016
ISBN
9788174867377
Weight
100 Gram
हे माझे पहिले नाटक; म्हणजे हे तसे दुसरे. कुडाळ मुक्कामी असताना मी एक सबंध तीन अकीं नाटक लिहिले होते त्याचा प्रयोगही तेथेच घडला होता. पण ते नाटक कुठेतरी गहाळ होऊन बसले आहे. हे ‘एक शून्य बाजीराव’ रंगायनने सादर केले; म्हणजे या नाटकाची खूपच बूज राखली गेली! योग्य माणसांच्या हाती आपली ‘कृती’ जाणे हेही महत्त्वाचे. विजया खोटे यांनी हे नाटक रंगभूमीवर उभे राहण्याच्या दृष्टीने काही मोलाच्या सूचना केल्या. मन:पूर्वकतेने हे नाटक रंगभूमीवर आणले. विशेषत: तिसऱ्या अकांचे पुनर्लेखन मी त्यांच्या सूचना लक्षात घेऊन केले आहे. मला वाटते, त्यामुळे पुनर्लिखित तिसरा अकं अधिक प्रयोगक्षम झालेला आहे. पहिल्या व दुसऱ्या अकांतील दाभाडे हे पात्र, दुसऱ्या अकांतील बाजीरावाच्या निर्गमनाची विशिष्ट जागा, आणि बाजीरावाची काही भाष्ये इत्यादी गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या आणि म्हणूनच मी रंगवृत्तीच्याच वळणाने पण मूळ हस्तलिखितानुसार ही प्रत तयार केली आहे.
0
out of 5