$9.15
Genre
Print Length
150 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 2010
ISBN
9789380361338
Weight
150 Gram
ज्यांनी मानवी संस्कृतीला आधार दिला , त्या नद्यांना आपण एकीकडे आई म्हणत म्हणत पूर्णपणे विद्रूप करून टाकले ; इतके की आता त्यांना खरा चेहराच उरला नाही . नद्या अशाप्रकारे बिघडल्याने आपल्यासाठी आपत्ती बनून राहिल्या आहेत . त्यांचे स्वास्थ्य बिघडल्याने पिण्याच्या पाणी , शेती , सभोवतालचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम झाले आहेत . उत्तर महाराष्ट्रातील पांजरेपासून मराठवाड्यातील मांजरेपर्यंत आणि कोकणातील पाताळगंगेपासून चंद्रपूरच्या इरई नदीपर्यंत राज्यभर हेच चित्र पाहायला मिळत आहे . त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत . त्यामुळेच नद्या सुधारायच्या असतील तर काळजीपूर्वक आणि तातडीने पावले उचलावी लागतील ! भारतातील व जगभरातील नद्यांच्या हासाचा आढावा घेऊन लेखक अभिजित घोरपडे यांनी महाराष्ट्रातील नद्यांच्या आजच्या वास्तवाचा , प्रत्यक्ष त्यांच्या पात्रात उतरून सर्वंकष वेध घेतला आहे .
0
out of 5