$8.48
Genre
Print Length
296 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 2022
ISBN
9789392374050
Weight
0.76 pound
पी.व्ही . नरसिंह राव अनपेक्षितरीत्या १ ९९ १ साली भारताचे पंतप्रधान झाले , तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संकटात पडलेल्या व हिंसक आंदोलनांनी ग्रस्त झालेल्या देशाची सूत्रं आली . त्यांचा पक्षही तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता. संसदेत त्यांचा पक्ष अल्पमतात होता , शिवाय त्यांना ‘१० , जनपथ ‘ च्या सावलीत सत्ता चालवावी लागत होती . आणि तरीही राव यांनी भारताला देशात व परदेशात नवी ओळख मिळवून दिली . जगातील मोजक्याच नेत्यांनी इतकी कमी सत्ता असताना इतका मोठा बदल घडवून आणलेला दिसतो. राव यांच्या यापूर्वी कधीच प्रकाशात न आलेल्या खाजगी कागदपत्रांचा अभ्यास करून आणि शंभरहून अधिक मुलाखती घेऊन विनय सीतापती यांनी हे चरित्र लिहिलं आहे . भारतीय अर्थव्यवस्था , आण्विक कार्यक्रम , परराष्ट्र धोरण व बाबरी मशीद अशा विविध मुद्द्यांवर या चरित्रातून नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे . तेलंगणातील एका गावातून केंद्रीय सत्तेपर्यंतचा आणि तिथून पुन्हा अपमानित निवृत्तीपर्यंतचा राव यांचा जीवनप्रवास रेखाटताना ,या पुस्तकात त्यांच्या आंतरिक खळबळीचीही दखल घेण्यात आली आहे . त्यांचं तणावदायक बालपण , त्यांचे भ्रष्ट व्यवहार व प्रेमसंबंध, त्यांचा सततचा एकाकीपणा यांचीही नोंद हे पुस्तक घेतं. एका प्रतिभाशाली राजनीतीज्ञाची अकथित कहाणी… नरसिंहावलोकन!
0
out of 5