Logo

  •  support@imusti.com

Asahi Pakistan (असाही पाकिस्तान)

Price: ₹ 310.00

Condition: New

Isbn: 9789382591412

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Reference,

Publishing Date / Year: 2014

No of Pages: 232

Weight: 232 Gram

Total Price: 310.00

    0       VIEW CART

साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान… पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी. अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली. पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती- कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरातिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रूपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा – असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात्‌ ‘असाही पाकिस्तान!’ – कुमार केतकर यांच्या प्रस्तावनेतून