₹200.00
MRPGenre
Print Length
243 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2022
ISBN
9789391469771
Weight
326 gram
रूढ अर्थानं ज्यांना ‘सेलिब्रिटी’ म्हणता येणार नाही, अशी अनेक मराठी मंडळी वेगळ्याच वाटेनं चालत असतात. प्रसिद्धी, मानसन्मान, त्यातून मिळणारा पैसा
या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला पटेल, आवडेल ते काम ही मंडळी स्वान्त सुखाय करीत राहतात. ‘विश्वसंवाद’ या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर येऊन गेलेल्या अनेक पाहुण्यांपैकी काही निवडक पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित हे पुस्तक. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतलं हे पहिलंच उदाहरण. गेल्या चार-पाच वर्षात पॉडकास्टींग या माध्यमाने
मराठीच नव्हे तर इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये
स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीमध्ये या माध्यमाची ओळख करून देण्यात
‘विश्वसंवाद’चा हातभार लागला याचा अतिशय आनंद वाटतो. हे पुस्तक वाचून आणि ‘विश्वसंवाद’च्या यू-ट्यूब चॅनेलवरील इतर मुलाखती ऐकून मराठी वाचकांमध्ये या माध्यमाची आवड निर्माण झाली, आणि त्याही पुढे जाऊन कुणी स्वतःचा पॉडकास्ट सुरु केला तर या धडपडीचं सार्थक झालं असं वाटेल.
0
out of 5