Logo

  •  support@imusti.com

Indira Antimparv (इंदिरा अंतिमपर्व)

Price: ₹ 200.00

Condition: New

Isbn: 9788174340467

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Novels & Short Stories,Memoir & Biography,

Publishing Date / Year: 2013

No of Pages: 140

Weight: 146 Gram

Total Price: 200.00

    0       VIEW CART

सनावली व घटनांच्या जंत्रीतून मांडलेला हा इतिहास नाही. भारताच्या इतिहासावर आपली ठसठशीत मुद्रा उमटवणार्‍या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या कालखंडाचा साक्षीदार असलेल्या लेखकानं झगझगत्या व धगधगत्या पर्वाचं घडवलेलं हे दर्शन आहे. पंतप्रधानांचे प्रमुख सचिव म्हणून काम करताना डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांना इंदिराजींचे कितीतरी करारी व कोमल पैलू पाहायला मिळाले. नातवंडांत रमणार्‍या, गंमतशीर किस्से सांगणार्‍या, परदेश दौर्‍यात तळपणार्‍या, पंजाब प्रश्नानं सचिंत झालेल्या, राष्ट्रपतींच्या संबंधातील ताणतणाव सांभाळणार्‍या, मंत्रिमंडळ फेररचना करताना अत्यंत गुप्तता बाळगणार्‍या व सहकार्‍यांना सहसा न दुखावणार्‍या पंतप्रधान अशी त्यांची नाना रूपं इथं भेटतात. एकदा तर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती असं अज्ञात असलेलं सत्य इथं सामोरं येतं. गंभीर-हसर्‍या, पोलादी-प्रेमळ, मुत्सद्दी-मिस्कील अशा इंदिराजींच्या कितीतरी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. १९८० ते १९८४ या काळातील पडद्यामागील घडामोडींचा हा अस्सल, वस्तुनिष्ठ आलेख. जितका ऐतिहासिक तितकाच चकित करणारा.