₹195.00
MRPGenre
Print Length
176 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9789382591740
Weight
220 gram
लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी निकोप सहजीवनाकडे वाटचाल होणं म्हणजेच खर्या अर्थाने लग्न यशस्वी होणं, असा कानमंत्र क्वचितच मिळतो. आणि मग बरेच जण ‘पदरी पडलं अन् पवित्र झालं’ म्हणत लग्न रेटत तरी राहतात किंवा मागचा-पुढचा विचार न करता ‘काडीमोड’ तरी करतात.
प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ विजय नागास्वामी यांनी या पुस्तकात लग्न यशस्वी होण्यासाठी लग्नाआधीपासूनच त्याचा पाया भक्कम कसा करावा, सहजीवन कसं ‘फुलवत’ न्यावं, हे सहजसोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. गेल्या काही वर्षांत, स्त्री-पुरुष यांचे संसारातले ‘रोल्स’ बदलल्याने नातेसंबंधांवर झालेल्या परिणामांचाही यात विचार केला आहे. पुस्तकात नागास्वामी यांनी पुढील विषय उदाहरणांसह स्पष्ट केले आहेत :
जोडीदाराची निवड
लग्नाचं बदलतं स्वरूप
व्यक्तिगत स्पेस व मॅरेज स्पेस
भावनिक व लैंगिक नात्यांचा विकास
एकमेकांच्या कुटुंबांशी असलेले नातेसंबंध
करिअर व कुटुंबाचा समतोल इत्यादी…
लग्न झालेल्या किंवा होऊ घातलेल्या अन् सुखी सहजीवनाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त; आणि हो, भेट देण्यासाठी उत्तम!
0
out of 5