₹160.00
MRPPrint Length
169 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2012
ISBN
9788174868503
Weight
185 Gram
मोनिका गजेंद्रगडकर यांच्या या दुसऱ्या कथासंग्रहातील बहुतेक कथानुभवांत वेगवेगळ्या स्तरांतील माणसांच्या जगण्यातील विकलता सामोरी येते. कधी धर्मावरील आत्यंतिक ‘श्रद्धे’मुळे, कधी भौगोलिक अंतरांमुळे, कधी माणसाला माणूस न समजल्यामुळे, कधी कलावंतांच्या मनस्वीपणाच्या आंतरिक तीव्र पिळांमुळे...ही विकलता माणसांना-त्यांच्यातल्या नात्यांना, स्त्री-पुरुष संबंधांना-त्यांच्या पूर्ण आयुष्यातलाच आर्त करून टाकते. कथानुभवांचे अंत:पदर सूचक, संयत आणि अकृत्रिम शैलीतून उलगडत जाताना संगीतातल्या आर्त स्वरांसारखे ते व्याकूळ करत राहतात. ही व्याकुळता हाच या कथांचा गाभा आणि त्यांचे सौंदर्यही. मोनिका गजेंद्रगडकरांच्या याआधीच्या ‘भूप’ या कथासंग्रहातील कथा माणसांमधल्या नात्यांचा, त्यांच्या मानसिक आंदोलनांचा आत्यंतिक तरलतेने वेध घेणाऱ्या होत्या. ‘आर्त’मधल्या कथांतील अनुभव अधिक सूक्ष्म, वैविध्यपूर्ण, प्रगल्भ आणि तितकेच अंतर्मुख करणारे आहेत.
0
out of 5