₹160.00
MRPGenre
Crime & Mystery, Novels & Short Stories
Print Length
136 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9789382591863
Weight
136 Gram
श्री. व सौ. देशमुख यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्मार्टफोन घेतला खरा, पण तो वापरताना काही चुकलं तर कुठेतरी गडबड होईल, या भीतीने ते अँड्रॉइड स्मार्टफोनचा पूर्ण वापर करताना बिचकत होते. पण थोड्याच दिवसांत, श्री. व सौ. देशमुख स्मार्टफोनला केवळ सरावलेच नाहीत, तर आत्मविश्वासाने फोटो काढून ते वॉट्सअॅप करू लागले, आणि हवे ते गेम्स, अॅप्सही डाउनलोड करू लागले! ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने! या मित्राने त्यांना खालील गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या : – बॉक्समधून आलेला नवाकोरा स्मार्टफोन कसा जोडायचा? – कॉन्टॅक्ट्स सेव्ह कसे करायचे, त्यांचे ग्रुप कसे करायचे? – एसएमएस, ग्रुप एसएसएस कसे करायचे? – कार्यक्रमाला जाताना फोन ‘सायलेंट’ कसा करायचा? – वाय-फाय स्मार्टफोनला कसे जोडून घ्यायचे? – ईमेल कसा करायचा? त्याला फाइल कशी जोडायची? – फोटो किंवा व्हिडिओ कसा काढायचा, तो शेअर कसा करायचा? – वॉट्सअॅप, फेसबुक इ. अॅप्स कशी वापरायची? – वॉलपेपर, थीम्स कशा बदलायच्या? – आणि अर्थात, ऑनलाइन शॉपिंग कसं करायचं… आणि अनेक! या पुस्तकातल्या छोट्या-छोट्या, पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्समुळे श्री. व सौ. देशमुख बिनधास्त स्मार्टफोनमधल्या उपलब्ध सोई-सुविधा वापरू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच तुम्हीही या अष्टपैलू स्मार्टफोनचं ‘बोट’ धरा, स्मार्ट व्हा!
0
out of 5