₹140.00
MRPPrint Length
232 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 1998
ISBN
9788174340078
Weight
450 gram
श्री. म.वा. धोंड हे कायम प्रवासात असतात. मुंबईतील ‘साहित्य सहवास’ मधल्या आपल्या घरातल्या खुर्चीत बसून ते एक गाडी पकडतात. ‘पिपात मेले’. ‘आनंदी गोपाळ’. ‘पोत’. ‘स्वीमी’. लता मंगेशकरांनी गायिलेले तुकारामाचे अभंग. बालकवींची ‘रमाई’ नाहीतर ‘नाच ग घुमा’. मूळ गाडी मर्यादित धावेची असली तरी धोंड ती आपल्याला हव्या त्या वेगाने फिरवतात. हे करताना त्यांचे दिशेने भान चुकत नाही. गाडीवरचे नियंत्रण सुटत नाही. ‘अपघात’ घडत नाही. गाडी मोडत नाही. कोणत्याही कुशल ‘ड्रायव्हर’ प्रमाणे या सगळ्याचे पक्के भान ते ठेवतात. पोचण्याचे ठिकाण ठरलेले असते पण वाटते जे जे भेटते ते स्वतंत्रपणे मन गुंतवणारे, चकित करणारे, दाद द्यावी असे असते. अशी कितीतरी ठिकाणे जागोजाग ते आपल्याला भेटवतात. यामुळेच हे ‘प्रवास’ सरळ रेषेतले आणि कामापुरते नाहीत, हे मुक्त आणि मजेचे आहेत. वाचकाला बरोबर घेऊन या पुस्तकात श्री.धोंड यानी असे एकुण अकरा प्रवास केले आहेत. त्यांची लेखनशैली व्यासंगी तितकीच ससीली, कधी गंभीर, कधी मिष्किल, कधी रंगेल आणि कधी चावटदेखील. गरजेनुसार यात उपरोधाची धार. अभ्यासाने सामान्य पंडितांना येते ते ‘जाड्य’ या पुस्तकात औषधालाही सापडणार नाही. विजय तेंडुलकर '
0
out of 5