₹550.00
MRPGenre
Novels & Short Stories
Print Length
375 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2016
ISBN
9788174340504
Weight
477 Gram
तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी. या पुस्तकाला मथुराबाई सार्वजनिक वाचनालय, बीडतर्फे दिला जाणारा महात्मा फुले साहित्य व वाङ्मय पुरस्कार (1991-92), साहित्य अकादमी पुरस्कार, नवी दिल्ली (1992), रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार (1992), पुणे नगर वाचन मंदिराचा कै. श्री. ज. जोशी पुरस्कार (1992), महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कै. वामन मल्हार जोशी पारितोषिक (1992-93), पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार (1992-93) आणि मारवाडी संमेलन : घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार (1992-93) मिळालेले आहेत.
0
out of 5