₹250.00
MRPGenre
Novels & Short Stories
Print Length
200 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2016
ISBN
9788174349781
Weight
210 Gram
...कैवल्य बाइकच्या आरशात पहात असताना डबल डेकर बसमधली हिरव्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी त्याला हलकेच हात दाखवते. अरे, कोण ही ? अशा कातर कातर वेळी ती हात दाखवून का गेली असेल ? हा नक्की कसला इशारा ? या नि अशा अनेक प्रश्नांनी पोखरलेल्या कैवल्यच्या मनात सुरु होतो एक फ्लॅशबॅक.. तो उलगडत जातो वाचकाच्याही डोळ्यासमोर अन सुरु होतो तिचा सनातन शोध .... ... जिथं तिनं बोलावलं आहे, तिथं ती उभी असेलच असं नाही आणि समजा उभी असली तरी ती तीच असेल, असंही नाही. ग्लोबलायझेशननं उभारलेल्या या मयसभेत जगण्याचे खरे वाटावे असे आभासी तुकडे पकडताना ही कादंबरी आपल्याला नखशिखांत बदललेल्या भवतालाची, उखडलेल्या नातेसंबंधांची आणि बाजाराच्या महापूरात वाहून जाणा-या शहराची गोष्ट सांगत जाते. नव्या पिढीलाच पेलणारी बोल्ड भाषा, जगण्याला भिडण्याची बेगुमान वृती, अंधा-या गुहेत शिरण्याचा बेदरकारपणा आणि अनवट भाषेत जगण्याचा शोध परिभाषित करण्याची अपरंपार ताकद या वैशिष्टयांमुळे श्रीरंजन आवटेंची 'सिंगल मिंगल मराठी कादंबरीत एका नव्या दालनाची कवाडं किलकिली करु पाहते... श्रीरंजन आवटे हे राज्यशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक असून त्यांची पहिली कादंबरी राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे.
0
out of 5