₹315.00
MRPGenre
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2019
ISBN
9789386628664
Weight
390 Gram
भगतसिंगच्या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. त्या बाजूवर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा अखेरचा शब्द नाही. ज्या बाबींकडे आजवर पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही, अशा काही बाबी ते नजरेस आणू इच्छिते. हा खटला म्हणजे एक फार्सच होता, या मुद्द्याची सखोल चिकित्सा आजवर झालेली नाही. कदाचित साँडर्सच्या हत्येत भगतसिंगचा नि:संशय सहभाग होता, म्हणून अशी चिकित्सा झाली नसेल. पण ‘लाहोर कटा’च्या खटल्याचा तपशीलवार अभ्यास गरजेचा आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला, १ मे १९३० रोजी गव्हर्नर जनरलनी वटहुकमाद्वारे हा खटला चालवण्यासाठी एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी – हाच या वटहुकमाचा हेतू होता._ए. जी. नूराणी
0
out of 5