₹300.00
MRPPrint Length
240 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2020
ISBN
9788194643876
Weight
327 gram
कॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्रं पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर? - अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक! रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात, तेव्हाच त्वचेखाली धावणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या रेषा उकलून आतल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात! ही चित्रंच आहेत. शब्दांनी रंगवलेली. पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती रंगांची पेटी देणाऱ्या जन्मदात्याची, वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार्या गुरूजनांची, भणाण डोक्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची, मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्तीची, धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची, काही दुखर्या पूर्णविरामांची ...ही शब्द चित्रं! - अपर्णा वेलणकर'
0
out of 5