Mrug Jalicha Masa (मृगजळीचा मासा)

By Kavita Mahajan (कविता महाजन)

Mrug Jalicha Masa (मृगजळीचा मासा)

By Kavita Mahajan (कविता महाजन)

250.00

MRP ₹275 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Poetry

Print Length

100 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2010

ISBN

9788174344243

Weight

136 Gram

Description

कविता हा एक सूक्ष्म जाणिवांच्या तीव्रतर अभिव्यक्तीचा प्रकार आहे. कवितांच्या मुळाशी अस्वस्थ करणारी संवेदनशीलता असावी लागते. शिवाय आनंदोत्सवात बुडून जाणारी अनावर इंद्रियजन्यताही लागते. तिची उपज अनुभवातच असते. नेमकी, संक्षिप्त, सूचक, अमूर्त, अनेकार्थी भाषा कवितेला लक्षणीय रूप देते. कविता महाजन यांच्या ‘मृगजळीचा मासा’ या संग्रहातील कविता अस्सल कवितेच्या सगळ्या प्राथमिक अटी पूर्ण करण्यात बव्हंशी यशस्वी होतात. त्यांचा भावनावेग प्रचंड वेगानं भाषेचा हिमखंड खेचून आणतो. आणि वाचकांना एकाचवेळी लाव्हारसाचा आंतरिक दाह नि रक्त गोठवणारी हिमसर्दता अनुभवायला लावतो. त्यांची कविता स्त्रीवादाच्या सांकेतिक अभिव्यक्तीला उद्ध्वस्त करते आणि वाचकांना विचारशील बनवते. शिवाय कवितांतल्या उत्स्फूर्त बोधनाच्या, अंतर्ज्ञानाच्या जागाही दाखवते. निव्वळ भावावेगात अडकून न पडता ती बुध्दीकडे प्रवास करते आणि वाचकांनाही या प्रवासाची सक्ती करते. यात सौंदर्याचा तोल ढळू न देण्याची काळजी घेते. विचार हरवत चाललेल्या आणि प्रतिक्रियांवरच आयुष्य घालवणा-या आपल्या सद्य:कालीन खुरटया समाजात या कविता विलक्षण झेप घेतात, वाचकांची जाण वाढवतात व वाचकाची आधिभौतिक भूक भागवण्याचाही प्रयत्न करतात. त्यांचा हा संग्रह प्रौढ, परिपक्व तर आहेच; समकालीन मराठी कवितेत त्यानं आपलं स्थानही अढळ केलं आहे


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%