₹250.00
MRPGenre
Novels & Short Stories
Print Length
150 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2011
ISBN
9788174341846
Weight
144 Gram
घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो! जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधूक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणार्या या आंधळ्याच्या गायी... त्यांना म्हणे देव राखतो...! आणि आंधळा? तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो. हे सर्व नियत वाचकांसमोर मांडणार्या मेघना पेठे यांच्या ताकदीच्या कथा.
0
out of 5