₹293.00
MRPGenre
Memoir & Biography, Novels & Short Stories, Film & Performing Art
Print Length
238 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2019
ISBN
9789386628947
Weight
250 Gram
क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये दिसणारा कामाठीपुरा हा सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला आहे. यातल्या चोवीस भागांतून पुरुषोत्तम बेर्डे आपलं बालपण, पौगंड आणि तारुण्य यांच्या साक्षीने अनेक माणसांच्या आयुष्यांच्या आत डोकावतो.
मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रांची दोन तालेवार पुस्तकं मला चटकन आठवतात. एक अर्थातच पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि दुसरं जयवंत दळवींचं ‘सारे प्रवासी घडीचे’. दोन्ही पुस्तकांची साहित्यिक गुणवत्ता मोठी आहे. ‘क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये या दोन्ही पुस्तकांपेक्षा एक गोष्ट अधिक आहे.
ती म्हणजे भौगोलिक सलगता.
कामाठीपुऱ्याच्या सोळा गल्ल्या. त्यातली अखंड चालणारी राडेबाजी. सिनेमा आणि गल्ली क्रिकेट. पुरुषोत्तमने स्वत: मोकळं होण्याची जी प्रक्रिया अनुभवली त्याचं फलस्वरूप म्हणजे हे पुस्तक._जयंत पवार
0
out of 5