Satyajit Ray Likhit Fantastic Feluda Rahasyakatha : Dafanbhumitil Gudh (सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा: दफनभूमीतील गूढ)

By Satyajit Ray, Ashok Jain (Anuvad) (सत्यजित रे, अशोक जैन (अनुवाद))

Satyajit Ray Likhit Fantastic Feluda Rahasyakatha : Dafanbhumitil Gudh (सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा: दफनभूमीतील गूढ)

By Satyajit Ray, Ashok Jain (Anuvad) (सत्यजित रे, अशोक जैन (अनुवाद))

150.00

MRP ₹157.5 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Crime & Mystery, Novels & Short Stories

Print Length

120 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2010

ISBN

9789380361147

Weight

120 Gram

Description

कोलकात्यातील पार्कस्ट्रीट दफनभूमीला भेट द्यायला गेले असताना फेलूदा व त्याच्या मित्रांना एक थडगं खणलेलं आढळतं. काही दुव्यांमुळे ते अत्यंत गुंतागुंतीच्या व रक्त गोठवणार्‍या रहस्यात सापडतात. एका उदास इमारतीतील मृतात्म्याशी चालू असलेलं संभाषण, उपाहारगृहातील एक गायक, एक धनाढ्य व निर्दय संग्राहक आणि दफनभूमीतील मध्यरात्रीचा पहारा यातून निर्माण झालेलं चक्रावून टाकणारं गूढ तुम्हाला अखेरच्या क्षणापर्यंत झपाटून टाकतं.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे नववे पुस्तक.

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%