₹350.00
MRPGenre
Memoir & Biography, Novels & Short Stories
Print Length
350 pages
Language
Marathi
Publisher
Manjul Publication
Publication date
1 January 2017
ISBN
9788183226905
Weight
450 Gram
सानिया मिर्झा ... महिलांच्या दुहेरी टेनिस या क्रीडाप्रकारात अव्वल स्थान मिळवणारी आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मुलींच्या दुहेरी टेनिस स्पर्धेत विम्बल्डन विजेतेपद पटकावून टेनिस जगताला आपल्या भुवया उंचावायला लावणारी खेळाडू! सन २००३ से २०१२ या कालावधीतली 'एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारांतली सर्वोतकृष्ट भारतीय खेळाडू' असा तिचा गौरव 'महिला टेनिस असोसिएशन' ने केला होता. चक्क सहा वेळा ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्यां सानियानं ऑगस्ट २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत तिची सहकारी मार्टिना हिंगीस हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग एक्केचाळीस वेळा विजेतेपद पटकावून नवा विक्रमच केला होता.
आव्हानांवर मात हे पुस्तक म्हणझे एका अव्वल भारतीय खेळाडूची संघर्षकथा आहे. स्वतःला आजवर कराव्या लागलेल्या मेहनतीचं अत्यंत प्रांजळ वर्णन सानियानं या पुस्तकात केलंय. या प्रवासात तिला सहन करावा लागलेले उपचार, तिच्या पाठीशी उभे
राहणारे कुटुंबीय, सार्वजनिक जीवनात झालेल्या टीकेवर आणि राजकारणावर तिनं केलेली मात ... अशा अनेक पैलूंविषयी सांगताना सानिया जणू यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा मूलमंत्रच देते.
सानियानं अनेक चौकटीबद्ध नियमांना चुकीचं सिद्ध केलं, तिनं केवळ आतला आवाज एकला ... तिनं सर्व मर्यादांपलीकड स्वतःच्या क्षमता ताणल्या ... केवळ आणि केवळ टेनिससाठीच तिनं सर्वस्व झोकून दिलं. ती देशासाठी खेळत राहिली; पण स्वतःच्या मानांकनाचा विचार तिनं कधीच केला नाही. आव्हानांवर मात करण्याची तिची ही संघर्षगाथा आज आणि उद्याही कित्येकांसाठी प्रेरणास्थान ठरेल, अगदी ती टेनिस कोर्टवरून निवृत्त झाल्यानंतरही!
0
out of 5