₹140.00
MRPPrint Length
188 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 1999
ISBN
9788174341426
Weight
100 gram
भावकविता ही काही विशिष्ट संदर्भांतच रचली गेलेली असते आणि त्या संदर्भांतच ती कृतार्थ होत असते. हे संदर्भ त्या कवितेवरूनच कळून येत नसले, तर अन्य मार्गांनी जाणून घ्यावे लागतात. ते नीट उमगले नाहीत, तर साहजिकच ती कविता दुर्बोध होते. मर्ढेकरांच्या कित्येक कवितांत याचा पुरा प्रत्यय येतो. मर्ढेकरांचा काळ आणि त्यांचे जीवन यांच्या संदर्भांतच त्यातील प्रतिमा खुलू- बोलू लागतात. मर्ढेकरांच्या काही दुर्बोध कवितांना हे संदर्भ पुरविण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखांत केलेला आहे. त्यातून अकल्पितपणेच नऊ सलग कवितांचा एक मोनोड्रामा साकार व्हावा हेच त्याच्या यशाचे आश्वासक गमक! '
0
out of 5