₹290.00
MRPGenre
Print Length
204 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 2022
ISBN
9788195253784
Weight
220 gram
या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे यात भरपूर फालतूपणा केलेला असतो . शब्दांचे खेळ , गद्य – पद्य विडंबनं , उगाचच केलेल्या कोट्या असतात . काहीवेळा तर कोट्या ‘ करायच्या म्हणून ओढूनताणून केलेल्या असतात . हे सारं करत असताना लेखक आपल्याकडे पाहून डोळा मारून जणू आपल्याला म्हणत असतो , ” बघा मी कसा फालतूपणा केलाय . हा खरा बावळटपणा नसतो . हे लक्षात येण्यासाठी वाचकही तसाच ‘ चतुर ‘ हवा . तसा नसेल तर त्याची चिडचिड होईल . ‘ हा काय आचरटपणा आहे ? ‘ असं तो डोक्यावरचे केस उपटत विचारील अशा विनोदी लेखनाच्या वाट्याला हा वाचक आला तर लेखकानं काशीत जाऊन प्रायश्चित्त घ्यावं. तेव्हा एक सावधगिरीची सूचना अर्थात वैधानिक इशारा : तुम्ही दुसऱ्या प्रकारातले म्हणजे ‘ असली ‘ वाचक असाल तर आणि तरच या पुस्तकाच्या वाट्याला जा . पहिल्या प्रकारचे वाचक असाल तर त्यांना टोकाचे आत्मक्लेश सोसावे लागतील त्या क्लेशांतून आनुषंगिक मेंदूविषयक आजार उद्भवले तर त्यांना लेखक – प्रकाशक – मुद्रक जबाबदार असणार नाहीत. मुकुंद टाकसाळे ( प्रस्तावनेतून )
0
out of 5