₹450.00
MRPGenre
Print Length
373 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174348791
Weight
300 gram
छोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षं लोटली. बघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली! त्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या. त्या मालिकांतली माणसं प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटू लागली...ती लोकांची दैनंदिन गरज झाली... रोजच्या चहासारखं व्यसनच...आणि मग...जाहिरातदारांनी छोटया पडद्याचा ताबाच घेतला. छोटया पडद्याभोवती मोठं अर्थकारण खेळू लागलं. राजकारणाचे डावपेच सुरू झाले. कला-साहित्य आणि माणूस सगळयांचंच खपाऊ असणं गरजेचं होऊन बसलं. या डावपेचांचं लक्ष्य ठरला - धनंजय चांदणे! खेडयातला एक सामान्य तरुण... छोटया पडद्याचं लक्ष त्याच्याकडे वळलं आणि पाहता पाहता काय घडलं? कला-साहित्य आणि समाज यांच्या मूल्य-व्यवस्थांमध्ये प्रचंड उलथापालथ करून टाकणा-या छोटया पडद्यामागच्या भयाण वादळाला चित्रित करणारी ही कादंबरी. नाटक-चित्रपट-मालिका या दुनियेत वावरणारे संवेदनशील रंगकर्मी अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून साकार झालेली कादंबरी.
0
out of 5