By Dr. Shuita Nandapurkar - Phadke (डॉ. शुचिता नांदापूरकर - फडके)
By Dr. Shuita Nandapurkar - Phadke (डॉ. शुचिता नांदापूरकर - फडके)
₹280.00
MRPGenre
Print Length
172 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2024
ISBN
9788119625406
Weight
229 gram
डॉ. रघुनाथ माशेलकर (FRS) जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. पुस्तक वाचताना आपण सहप्रवासी कधी होतो ते समजतच नाही, ही त्यातली खरी गंमत आहे. त्या दोन मित्रांच्या गप्पांत आपण रंगून जातो, जणू तो काळ जगू लागतो, त्यायोगे आपल्या ज्ञानात तर भर पडतेच, पण आपण नकळत सुज्ञतेचे धडेही आत्मसात करतो.... कृष्णाच्या दैवी रूपापल्याड नेणारी ही शिकवण आहे... प्रत्येकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे, हे मी आवर्जून सांगेन. डॉ. सुचेता परांजपे संस्कृत, ‘वेदिक स्टडीज' आणि ‘इंडॉलॉजी'; मध्ये जगभर मान्यताप्राप्त विदुषी; अमेरिकन, जर्मन विद्यापीठात प्राध्यापिका (BORI) महाभारत चिकित्सक आवृत्तीच्या समितीवर आहेत. दोन निरनिराळ्या व्यक्तींनी एकत्र येऊन प्राचीन इतिहासाला आजच्या संदर्भात आणून एक अतिशय वाचनीय आणि उत्सुकता वाढवणारं वाङ्मय लिहायचं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. खूप अवघड मार्ग आहे हा. कुठेही, अगदी काळाबद्दलही चूक नाही; सगळं कसं एकसंध. आपल्या प्राचीन परंपरा आणि वाङ्मय यांना कारण नसताना धुत्कारणा-या नवीन पिढीचे डोळे उघडणारं हे मनोरंजक पुस्तक सर्वांनीच वाचावं असं आहे. डॉ. मोहन आगाशे मानसोपचारतज्ञ, कलाकार, संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते अगदी सामान्य परिस्थितीमधील गंमत शोधण्याची हातोटी लेखकांपाशी आहे आणि ही विनोदबुद्धी मला आनंददायी वाटली... पुस्तकाची भाषा सहज आहे. अनेक बोधकथा आणि दंतकथा सांगताना वापरलेली दोन पात्रांमधील संवादात्मक शैली मनोवेधक असल्यामुळे पुस्तक हातांतून सोडवत नाही... अनुभवानुसार हे पुस्तक वाचून झाल्यावरसुद्धा दीर्घकाळ माझ्या स्मरणात राहील.
0
out of 5