$14.00
Genre
Print Length
225 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174348401
Weight
201 Gram
राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आणि त्यांना दूर... ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात डांबण्यात आले. ती शिक्षा लोकमान्यांना क्लेशदायक ठरली, हे तर खरेच; पण सुदैवाने त्या एकांतवासात अवघ्या पाच महिन्यांच्या अवधीत त्यांनी 'गीतारहस्य' हा अदभुत ग्रंथ लिहून पूर्ण केला. निष्काम कर्मयोग हाच गीतेचा संदेश आहे, हे आपले मत ठासून मांडणारा लोकमान्यांचा हा ग्रंथ मराठी समाजाच्या अभिमानाचा विषय ठरला आहे. तथापि दुर्दैवाने तो गहनगंभीर ग्रंथ सर्वसामान्यांना समजून घ्यायला मात्र कठीण जातो. साहजिकच लोकमान्यांचा संदेश सामान्य वाचकांपर्यंत पोचू शकत नाही. त्या संदेशाचे मोठेपण आणि सामान्य वाचकाची आकलनशक्ती यांमधील दरी सांधण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या एका व्यासंगी चिंतकाने त्या महान ग्रंथाचा केलेला हा सुबोध संक्षेप…
0
out of 5