Logo

  •  support@imusti.com

Porvay (पोरवय)

Price: ₹ 100.00

Condition: New

Isbn: 9788174860132

Publisher: Mouj Prakashan Griha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir and Biography,Novels and Short Stories,

Publishing Date / Year: 2012

No of Pages: 72

Weight: 115 Gram

Total Price: 100.00

    0       VIEW CART

गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या ‘छेलेबेला’ ह्या आत्मकथनाचं ‘पोरवय’ हे मराठी भाषांतर आहे. वयाची ऐंशी वर्षं उलटून गेल्यावर ह्या कथनातून त्यांनी आपलं पोरवय उभं केलं आहे. पोरवयातल्या डोळ्यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं, त्याची ही संस्मरणं आहेत. त्या काळी त्यांचा ज्यांच्याशी संबंध आला, लोभ जडला, त्या आप्तस्वकीयांची, गुरुजनांची, सेवकांची, जोराशांको येथील त्यांच्या भव्य वास्तूची, तिथल्या पुष्करिणीची, वृक्षलतांची, गच्चीत संध्याकाळी जमणाऱ्या काव्य-शास्त्र-विनोदाच्या मैफिलींची रविन्द्रांनी हळुवार शब्दांनी रेखाटलेली ही स्मृतिचित्रं आहेत. प्रौढत्वीं निज शैशवास जपणें बाणा कवीचा असे असं केशवसुत म्हणून गेले. ते जपणं किती हृदयस्पर्शी असतं याचं ‘पोरवय’ हे एक सुंदर उदाहरण आहे.