₹250.00
MRPPrint Length
221 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2021
ISBN
9789391469641
Weight
431 gram
श्री. एन. बी. धुमाळ यांचे ‘यशस्वितेचा सुवर्णमंत्र’ हे पुस्तक वाचून मनस्वी आनंद झाला. श्री. धुमाळ यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी ही शेतकरी, वारकरी अशा स्वरूपाची. मात्र त्यांच्या यशोगाथेचा प्रवास थक्क करून सोडणारा वाटला. पुस्तकातील भाषा अतिशय ओघवती असून त्यामध्ये भावना आणि आशय यांचा सुंदर मिलाफ दिसतो. स्टेट बँकेची नोकरी सोडून एक मोठे स्वप्न घेऊन जगणारा व यशोशिखराकडे जाण्यासाठी धडपडणारा तरुण उद्योजक या पुस्तकातून वाचावयास मिळाला. या पुस्तकातून स्वानुभवावर आधारित सांगितलेल्या यशस्वितेच्या गोष्टी आजच्या तरुणाईसाठी उद्योगाची नवनवीन क्षितिजे निर्माण करतील, असा मला विश्वास वाटतो. पद्मभूषण डॉ. विजय भटकर —- ‘यशस्वितेचा सुवर्णमंत्र’ हे पुस्तक म्हणजे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे, याचा सोन्यासारखाच मंत्र श्री. एन. बी. धुमाळ यांनी तरुणांना दिला आहे. ‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीप्रमाणे वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत सात किलोमीटरच्या परिघाबाहेर न पडलेल्या पण उच्च महत्त्वाकांक्षा, सातत्य व अफाट कष्टाने स्वत: समृद्ध होऊन हजारोंना समृद्ध करणारे श्री. धुमाळ आतापर्यंत अर्धे जग फिरून आले. स्वत: यशस्वी उद्योजक बनून इतरांना उद्योजक करणारे श्री. धुमाळ यांचा जीवनपट एखाद्या सिनेमासारखा स्वप्नवत वाटतो. व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रांत मोठे यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत, ही त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची किमया आहे. यशस्वी जीवनासाठी लागणाऱ्या अनेक क्लृप्त्या त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्यांचा ज्ञानदानाचा व अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदानाचा वसा एक आदर्शवत आहे. एकविसाव्या शतकात शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसाय कसा करावा, याचा यशोमार्गच त्यांनी या पुस्तकातून दाखवला आहे. हे पुस्तक वाचून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण केल्यास अनेक उद्योजक घडतील, असा मला विश्वास वाटतो व हीच काळाची गरज आहे. त्यांच्या या यशस्वितेच्या सुवर्णमंत्रास माझ्या हार्दिक शुभेच्छा ! पद्मश्री पोपटराव पवार
0
out of 5