Logo

  •  support@imusti.com

Conckretechi Vanarai: Pragat, Suniyojit, Sundar Sharanch Swapn... (काँक्रीटची वनराई: प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न...)

Price: ₹ 85.00

Condition: New

Isbn: 9789382591115

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Reference,Other,

Publishing Date / Year: 2013

No of Pages: 185

Weight: 200 Gram

Total Price: 85.00

    0       VIEW CART

काँक्रीटचं जंगल’ म्हटलं की डोळयासमोर उभ्या राहतात आक्राळविक्राळ, कशाही-कुठेही बांधलेल्या इमारती! पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का? शहरांबाबतच्या समाजातील अशा प्रकारच्या प्रचलित नकारात्मक समजुती आणि विस्तारणारं नागरीकरण हा प्रचंड विरोधाभास लेखिकेलाही चक्रावून टाकतो. या विरोधाभासाचा शोध घेण्याचा, त्यामागची गृहितकं तपासण्याचा, नागरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून देण्याचा सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक! लेखिकेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी शहरं निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तम सोयी-सुविधांनी युक्त शहरांच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाची. ज्याप्रमाणे एखादी वनराई फुलवायला, ती वृध्दिंगत करायला एका कुशल माळयाची व त्याच्या प्रेमळ संगोपनाची गरज असते त्याचप्रमाणे आजच्या काँक्रीटच्या जंगलाचं वनराईत रूपांतर करण्यासाठी आज गरज आहे ती द्रष्टया लोकनेत्यांची आणि व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या कुशल प्रशासकांची. या दृष्टीने या पुस्तकातील चर्चा व मुद्दे वाचकांना व संबंधितांना आजच्या बकाल काँक्रीटच्या जंगलाचं रूपांतर सुंदर व नियोजनपूर्ण ‘वनराई’मध्ये करण्यास नक्कीच उद्युक्त करतील.